पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचें मूलनिवासस्थान. व हल्ले केल्याची उदाहरणें इतिहासांत सांपडतात. आतां जें राहिले तें शमी नामक तिसरें कुटुंब होय. ह्याचें निवासस्थान युफ्रेतीस व तैग्रीस या नद्यांजवळ असल्याचे कळते. या कुटुंबांतले लोक देशभिन्नतेप्रमाणे तीन प्रकारच्या निरनिराळ्या भाषा बोलत. बॉबिलन आणि निनव्ही येथील लोक आरामी भाषा बोलत. पालिस्तैन, फिनिशिया, व कार्येज, येथील लोक हीब्रु भाषा बोलत. आणि अरबस्थानचे लोक अरबी भाषा बोलत. सदरहू तिन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश शमी कुटुंबांतच होतो. मिसर देशांत प्राचीन सांकेतिक चिन्हात्मक अक्षरांची जी कापती नामक भाषा सुरू होती, ती याच कुळांतील असल्याविषयी कल्पना आहे. ही सांकेतिक भाषा १७ व्या शतकानंतर बोलण्याची बंद झाली. आतां, सुधारलेल्या जगाच्या इतिहासांत आर्य व शमी ह्या दोन कुळांचाच समावेश होत असून, तुराणी लोक कधीं कधीं हल्ले करून त्यांस अडथळे मात्र करीत असत, असे भाषातत्वज्ञांचे मत आहे. आर्य लोक आपल्या मूळच्या निवासस्थानांत बायका- मुलें, व गुरेढोरें, यांसहित राहिले असावे असें अनेकभाषा- आर्य लोकांची मूल कोविदांचें अनुमान आहे. ते आपला गृहास्थति. सर्व प्रपंच बरोबरच घेऊन हिंडत तिसरें शमी नामक कुटुंब. ११