पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग त्मकग्रंथ त्यांजकडून मुळींच झाले नाहीत, हे जास्त सांगावयास नको. प्रायः आमच्या संस्कृत कवींचा कल्पनाओव फक्त पद्यरच- नेवरच होता, असे देखील ह्मणण्यास काही हरकत नाहीं. याप्रमाणे सर्वांनीं सतत अवलंबन केलेल्या प्रणालिकेंत, केले असून, त्याचेंच गद्यात्मक कवित्रय एकदम बदल करण्याचे अनुकरणीय व स्तुत्य साहस प्रथम दंडी कवीनेंच अनुकरण त्याच्या पश्चात् सुबंधु व ब्राण, या कविद्वयांनी केले. त्यायोगानें अधींच अलंकृत असलेल्या संस्कृत भाषेस अतीव रमणीयता प्राप्त झाली. इतकेंच नाहीं तर, या प्रसिद्ध कवित्रयांनी गद्यग्रंथ रचून उत्कृष्ट पदलालित्य, सुंदर श्लेपरचना, आणि मनोवे- धक व उदात्त प्रागल्भ्य, अशीं अनुक्रमें व्यक्त केली. २२६ गद्यग्रंथ. दंडी. दंडी हा इसवी सनाच्या सहाव्या शतकांत उदयास आला असल्याविषय, हल्लीं उपलब्ध असलेल्या विद्वज्जनांच्या ग्रंथावली- वरून दिसून येतें. ह्याचा प्रसिद्ध ग्रंथ झटला ह्मणजे गद्यरूप दशकुमारचरित होय. वास्तविक पाहतां हा ग्रंथ कादंबरीच्या तोडीचा नसून, त्यांत संविधानकचा- तुर्य देखील कांहींच दिसून येत नाहीं. यांत एक सबंध गोष्ट मुळींच नाहीं; तर, दशकुमारांची दहा निरनिराळी चरित्रे वर्णन केली आहेत. तसेच, यांत ह्मणण्यासारिखा सुरस