पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा. ] गद्यग्रंथ. रघुवंश आणि कुमारसंभव या महाकाव्याखेरीज खालीं लिहिलेलीं दुसरीं महाकाव्यें- ही प्रसिद्ध आहेतः -- - २२५ महाकाव्ये. १ भट्टीकाव्य ( भर्तृहरिकृत. इ० स० चे सहावें किंवा सातवें शतक ); यांत रामचंद्राचा कथाभाग असून व्याकरणसंबंधी विशेष विवेचन आहे. २ माघकाव्य ( शिशुपालवध माघकृत; इ० स० चे १० वें शतक; या कवीचा आजा सुप्रभदेव, हा श्रीधर्मनाभ राजाच्या पदरी प्रधान होता ). ३ कीरातार्जुनीय ( भारविकृत; इ० स० चें १० वें शतक ); ४ नैषध ( श्रीहर्षकृत; इ० स० १२ वें शतक ). ५ राघवपांडवीय ( कविराजकृत; इ० स० ११ वें शतक ); हें काव्य सर्वमान्य असून त्यांत शब्द योजना अशी कांहीं चमत्कारिक केली आहे कीं, तेच ते शब्द रामायण व महाभारत यांतील कथानकाकडे लागू पडतात. ६ नलोदय ( कालिदासकृत असल्या- विषयीं आख्यायिका आहे; इ० स० ७८), गद्यग्रंथ. वर सांगितलेल्या सर्व कविजनांचा भर केवळ पद्यरूप- काव्याकडेसच असल्यामुळे, गद्यरूपकाव्य किंवा गद्या-