पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२४ भारतीय साम्राज्य. [ भाग व अनेक तरंग, हे तो प्रेक्षकापुढे अगदी हुबेहुब ठेवून देतो. बाह्य सृष्टिवर्णनांतही त्याचा हातखंडाच. सृष्टपदा- र्थांची चमत्कृति, विद्युलतेचा प्रभाव, वर्षाकाळाची शोभा, गिरिकंदरांचें वैभव, वनश्रीचें ऐश्वर्य, आणि नागरिक संपत्ति, इत्यादिकांचें वर्णन करण्यांत त्याची अनुपम शैली दिसून येते. भवभूति हा इसवी शकाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयास आला असावा त्याचा काल व असें अन्तःप्रमाणावरून कळून येते. त्याच्या बापाचें नांव नीलकंठ असून, तो दक्षिण देशांत पद्मपूर नामक नगरी, डंबर नांवाच्या तपोनिष्ट ब्राह्मण कुलांत जन्मला होता. ह्या आपल्या कवीच्या आईचें नांव जातुकर्णी असून, खुद्द त्यास भट्टश्रीकंठ असेही पुढे ह्मणत. कुल. इतर नाटकें, व ह्याच्या खालोखालच्या तोडीची नाटकें ह्मटली ह्मणजे शूद्रककृत १ मृच्छकटिक ( इ० श० पू. २१ वर्षे ); राजशेखरकृत २ विद्धशालभंजिका ( इ० स० चें दहावे शतक ); भट्ट- नारायणकृत ३ वेणीसंहार ( इ० स० १०७२); धाव- ककृत ४ नागानंद वं ५ रत्नावलि ( इ० स० चें बारावें शतक ); विशाखदत्तकृत ६ मुद्राराक्षस ( इ० स० चें बारावें शतक ); आणि कृष्णमिश्रकृत ७ प्रबोधचंद्रोदय इ० स० चें बारावें शतक ); वगैरे होत.