पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा. ] नाटके व काव्ये. २२३ ष्कृत केला आहे. कपाल कुंडलेनें मालतीस नेल्यावर माधव अगदीं निराश होऊन, संध्याकाळच्या समयीं स्म- शानांत फिरत असतां, पिशाचांच्या चेष्टा त्याच्या दृष्टीस पडल्यावरून, त्यांचें त्यानें वर्णन केले आहे. त्यांत भयानक आणि बीभत्स रस इतके सुरेख उतरले आहेत की, ती अपू- वयोजना अगदी योग्य स्थली झाल्यासारिखें दिसते. यांतील भाषा फारच प्रौढ असून विचारसरणी अगदी उदात्त आहे. महावीरचरितांत वीररस मुख्य असून क्वचित् ठिकाणी मात्र शृंगा- महावीरचरित. राची झांक मारते. उत्तररामचरित है भवभूतीर्चे तिसरें नाटक होय. उत्तररामचरित. यांत करुणारस प्रधान असून, हें नाटकच या कवीच्या विशेष कीर्तीस कारणीभूत झालें. करुणारसाशीं संभोगश्रृंगार, आणि विप्रलंभश्रृंगार, असे पहिल्या अंकांत मिसळले असून, पां- चव्यांत व सहाव्याच्या आरंभी वीररस, आणि सातव्यांत शेवटीं अद्भुत रस दृष्टिगोचर होतो. त्याचे कविगुण. “कारुण्यंभवभूतिरेवतनुते " — ही उक्ति अर्थशः खरी असून, करुणरस हा भवभूती- ला अत्युत्कृष्टच साधला आहे. तसेंच मनुष्याच्या हृद्गताचें मार्मिक ज्ञान देखील या कवीस फारच उत्तम असल्यामुळे, मानवी स्वभावाचे नानातऱ्हेचे विकार