पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ भारतीय साम्राज्य. । कार्तिःप्रवरसेनस्यप्रयाताकुमुदोज्ज्वला सागरस्यपरंपारम्कपिसेनेव सेतुना ॥ निर्गतासुनवाकस्यकालिदासस्य प्रीतिर्मधुरसार्द्रासुमंजरीष्विव सूक्तिषु । जायते ॥ [ भाग शाकुंतल. काव्यापेक्षां कालिदासाची नाटककार म्हणून फारच ख्याति आहे. त्याचें अत्युत्तम आणि जगद्विख्यात नाटक म्हटले म्हणजे शाकुंतल होय. या नाटकाच्या योगानें त्याचे अलौकिक गण युरोपखंडांत व इतर पाश्चिमात्य राष्ट्रांत तात्काल पस- रून, त्याची कीर्ती अमर झाली, आणि त्याविषयी सर्वांचें कुतूहल सतत जागरूकच राहिलें. आमच्या संस्कृत शास्त्र भांडाराची व अपूर्व काव्योदधीची माहिती, पाश्चिमा- त्यांस थेट गेल्या अठराव्या शतकापर्यंत नव्हती, असे ह्मटले तरी चालेल. संस्कृत भाषेची विशेष अभिरूचि पाश्चिमात्यांस लागण्याला, मुख्यत्वेंकरून सर विल्यम् जोन्स हाच कारणीभूत झाला, असें ह्मणण्यास काही हरकत आहे असे वाटत नाहीं. हा प्रसिद्ध विद्वान् गृहस्थ सुमारे शंभर वर्षीमार्गे बंगाल्यांत न्यायाधीश होता. त्यावेळी त्याला आमच्या एका पंडिताकडून असे कळले कीं, संस्कृत भाषेत कांहीं अपूर्व नाटकें, सुरम्य काव्यें, आणि नानाविध शास्त्रकलाप आहेत. ही गोष्ट त्याला सम-. जतांच त्यानें त्याभाषेचा अति परिश्रम घेऊन अभ्यास केला; ●