पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] नाटके व काव् २१७ यांतील देखील संविधानक नसतांही, त्यांत कालिदासाने आपली अलोट कल्पनाशक्ति, अद्भुत बुद्धिवभैत्र, आणि अति तीव्र कवित्व दाखविल्याचे दिसतें. कारण, विषय म्हटला म्हणजे कायतो, एका शापाभिहत यक्षानें रामगिरीपासून अलकापूरी पर्यंत आपल्या विरहानें विव्हल झालेल्या कृशांगी स्त्रीस, मेघरूपी दुताबरोबर पाठविलेला नि- रोपच होय. याप्रमाणे या खंडकाव्याचा पाया इतका निर्जीव असूनही, त्यावर उभारलेली इमारत इतकी दृढतर, भव्य, टुमदार, आणि रमणीय भासते कीं, तिच्यांतील प्रत्येक देखावा डोळ्यापुढे मूर्तिमंत उभा राहतो, व तिच्यांतील प्रत्येक गोष्टीचें वर्णन अगदी हुबेहूब असल्यामुळे, तें जणूकाय त्या त्या गोष्टीशी आपला प्रत्यक्षच परिचय करून देत असल्याचे दिसतें. वर्षाकालीं मेघाचें दर्शन, तदानुषंगिक चित्ताची अतीव विव्हल वृत्ति, त्या समायाचे भिन्न भिन्न देखावे, पक्षांचें पर्यटन, सृष्टिचमत्कृतीचे मनावर झालेले संस्कार, मेघमार्गनिर्देश, तदनुसार नाना- विध स्थलप्रकाशन, आणि त्या सर्वांचें सुरेख वर्णन, हीं यांत फारच मार्मिकपणाने साधलेली आहेत. सेतुकाव्यां तील पदलालित्य फारच चटकदार असून, त्यांतील शब्दरचना मधानें थबथबलेल्या फळाप्रमाणें अति मधुर आहे. याविषयीं प्रसिद्ध बाण कवि आपाल्या हर्षचरितांत अर्से लिहितो की:- सेतुकाव्य. - १९