पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] नाटके व काव्ये २१९ त्याचें भाषांतर. पुढे कांहीं कालाने त्यांत त्याची चांगली प्रवीणता झाल्या- वर, त्यानें शाकुंतलाचें इंग्रजीत भाषांतर करून इ० स० १७८९ साली ते युरोपांत प्रसिद्ध केलें. त्यामुळे, आमच्या ह्या कवि- पुंगवाची अजरामर कीर्ती प्रथमच देशांतरास जाऊन सर्व भूमंडलावर पसरली. इतकेंच नाहीं तर, त्यायोगानें युरोपांतील अनेक पंडितांचें मन अगदी वेधलें जाऊन, त्यांनी संस्कृताचा अभ्यास फार झपाट्यानें चालविला. त्यानंतर त्यांस या संस्कृत खाणीचें अत्यु- ज्ज्वल तेज दृष्टीस पडून, त्यांतील अमूल्य रत्नें व कनक- मय अलंकार, हे यच्चावत् धुंडाळून काढून तीं सर्व स्वस्थानापन्न करण्यासाठी, त्यांनी आपले तनमनधन खर्च केर्ले, व अजून देखील खर्च करीत आहेत; तेणें- करून त्यांच्या प्रयत्नाचें चीज होऊन, त्यांच्या परिश्रमा- चेंही साफल्य झालें. याप्रमाणें संस्कृत भाषेच्या अभ्या- सास विशेष प्रोत्साहन मिळाल्यामुळे, त्याचा आल्हाद- कारक परिणाम तेव्हांच उदयास येऊं लागला. असो. शाकुंतलाचा केवळ भाषांतररूपानें रसास्वाद त्याविषयींची युरोप घेऊन देखील जर्मनींतील प्रसिद्ध खंडांतील कीर्ति व पा- कवि गेटी, प्रख्यात तत्ववेत्ता श्चिमात्यांचा अभिप्राय. हंबोल्ड, मर्मज्ञ व रसिक गोएथ, आणि सर्वांस महाशूर असा विद्वान् श्लेजेल, यांनीं