पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० भारतीय साम्राज्य. [ भाग वैश्य, असे वंशज आहोत. आणि त्यांचेंच बुद्धिसामर्थ्य, बाहुप्रताप, व पराक्रमनैपुण्य, यांविषयी पुढे सविस्तर विवे- चन योग्य वेळीं व यथावकाश करण्यांत येईल. वर जीं मानव जातीची तीन कुटुंर्वे निर्दिष्ट केली त्यां- पैकीं तुरागी नामक कुटुंब दुसरें होय. हे लोक पृथिवीवर दुसरेँ तुराणी कुटुंब जिकडे तिकडे पसरलेले होते. तथापि त्यांनी आपल्या बाहुबलाने एखादा देश जिंकून स्वतंत्र राज्याची स्थापना केल्याचें कोठेही ऐकिवांत नसून इतिहासप्रसिद्धही नाहीं. ह्या लोकांचा इतिहास असल्याचें कळून येत नाहीं; व तो कदाचित् असला तरी कोठेंच उपलब्ध नाहीं. हे लोक इतस्ततः परि- भ्रमण करीत असतां, अधिक बलाढ्य व पराक्रमी राष्ट्रांशीं त्यांचा साम्ना होऊन ते पराभूत झाल्यामुळे, त्या विजयी लोकांनी व्याप्त केलेली ठिकाणे ह्या तुराणी लोकांनी सोडून देऊन ते भरतखंडांतील अरण्यमय पर्वत, त्याच्या दक्षि णेकडील अति दूरचा वस्तिरहित प्रांत, मलाया द्वीकल्प, आणि पालिनीशिया बेटें, येथे येऊन राहिले असल्या. विषयीं अनुमान होतें. व तेव्हांपासूनच त्यांजविषयी थोडी- बहुत माहिती आपणास लागते. तुराणी लोकांचें मूळ राहण्याचे ठिकाण भरतखंडाच्या आसपास, किंवा मध्य- आशियांतील पठार प्रदेशांत असावें. तथापि, आपली मूळस्थानें सोडून, तुराणी लोकांनी अनेक वेळां बखेडे