पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ऋतुसंहार. " म ऋतूंत सृष्टीचीं निरनिराळी रूपें कशीं दृष्टीस पडतात, आणि सृष्टिचमत्कृतीचें वैभव करें भासमान होतें. याविषयीं वर्णन आहे. यांतील विशेष गुण ह्मटले ह्मणजे मधुर व कोमल पदरचना, आणि सा- र्द्र अर्थनिबंधन, हीं होंत. कुमार संभवांत ठिकठिकाणी विचि- त्र देखाव्यांचें मनोहर वर्णन केले असून, त्यांत शृंगार आणि करुणारस यांचे हृदयद्रावक मिश्रण दृग्गोचर होतें. प्र स्त काव्यांत, “कुमार संभव" ह्मणजे “कार्तिकेयाचा जन्म, " याविषयींचा कथाभाग असून, त्याचे सात सर्ग आहेत. परंतु अलीकडे त्याचे आण दहा सर्ग असल्याविषयीं शोध लागला आहे. तथापि, ते कालिदासकृत नसून, ते त्याच्या एकाद्या शिष्यानेंच रचले असावें असें बहुमत आहे. सर्व काव्यांत रघुवंश हें का- लिदासाचें अत्युत्कृष्ठ काव्य होय. यांतील उत्तम भाषाप्रौढी, सुरेखवर्णन, उदात्त रचना, आल्हादकारक पदलालित्य, आणि भिन्न भिन्न रसांचा समयोचित आविर्भाव, इत्यादि गुणांनी हें अलंकृत असल्या कारणानें, त्याचा यशोध्वज स्वयमेवच स्थापित होऊन, तें श्रेष्ठत्वास पावलें. यांत दिलीपापासून तोतहत अग्निवर्णन म्हणून जो रघु वंशांतील शेवटचा राजा झाला त्यापर्यंतच्या वंशांवलीचें वर्णन आहे. मेघदुतांत म्हणण्या सारिखें कांहीं रघुवंश. मेघधूत,