पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] नाटके व काव्ये. २१५ तो इसवी शकाच्या आठव्या शतकांत झाला असावा. कोणी ह्मणतात सहाव्या शतकांत. कोणी ह्मणतात तिसऱ्या शतकांत. आणि कोणी ह्मणतात पहिल्या शतकांत. परंतु हल्लीं अगदर्दी नूतन शोधावरून असे खात्रीपूर्वक कळून येतें कीं, तो प्रसिद्ध विक्रमादित्य राजाच्या कारकीर्दीत, ह्मणजे इसवी सनापूर्वी ५६ वर्षे उदयास आला होता. त्याचे ग्रंथ. कालिदासाचे मुख्य ग्रंथ ह्मटले ह्मणजे, काव्यांत १ ऋतुसंहार, २ कुमारसंभव, ३ रघुवंश, ४ मेघदूत, आणि ५ सेतु- काव्य, हे असून, नाटकांत १ शाकुंतल, २ विक्रमो- र्वशी, व ३ मालविकाग्निमित्र, हे होत. यांखेरीज १ प्रश्नो- त्तरमाला, २ असज्जनवर्णन, ३ हास्यार्णवनाटक, ४ कर्पूर- मंजरी, ५ श्यामलादंडक, ६ भोजचंपू, रामायणंचपू ८ महापद्माष्टक, ९ गंगाष्टक, १० राक्षसकाव्य, ११ पुष्प- बाणविलास, १२ श्रुतबोध, १३ शृंगारतिलक, आणि १४ शृंगारसाष्टक, हे ग्रंथ देखील त्यानेच केले असल्याविषयीं प्रसिद्धि असून, त्यांतील शेवटले तीन हल्लीं उपलब्ध व सर्वांस महशूर आहेत; आणि बाकी राहिल्यांपैकी काही उपलब्ध नाहीत, व कांहीं त्याच्या नांवावर मात्र विकले जातात अशी कल्पना आहे. ऋतुसंहारांत षड्ऋतूंचें वर्णन असून, त्यांत भिन्नभिन्न