पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ भारतीय साम्राज्य. [ भाग like the Himalayas, above the bulkiest compositions of every land beyond the confines of India. ' कविश्रेणी. अस्तु. ह्या कविमालिकेतील प्रत्येकाचें विवेचन करण्या- विषयीं प्रस्तुत ग्रंथाची योजना नाहीं. सत्रब त्यांपैकी जे कविपुंगव असून सर्वानुमतें अत्युत्कृष्ठ व श्रेष्ठतर आहेत, त्यांजविषयींच दोन शब्द लिहिण्याचें मनांत आणिलें आहे. कालिदास. ह्या श्रेष्ठ कविश्रेणीत देखील, अत्युत्तम आणि अग्रेसर असा कालिदासच होय. त्याची अलोट कविताशक्ति; त्याचे काव्यर- सार्ने थबथबलेलें असें मनोहर काव्य; सृष्टिवैभव वर्णन करण्याचें त्याचॆं अद्भुत सामर्थ्य; त्याचें मानुषीय स्वभावाचें मर्मभेदक ज्ञान; त्याचा तदन्तर्गत पूर्ण परिचय; त्याची अनुपम रसज्ञता; त्याचें हृदयद्रावक उपमाचातुर्य; त्याच्या विलक्षण कल्पनेची सौन्दर्यश्री; त्याचे अप्रतीम बुद्धिवैभव, आणि त्याची उदात्त विचारसरणी; इत्यादि गुणांनीं त्याचे श्रेष्ठत्व ह्या भूतहावर, सर्व राष्ट्रांतील विद्वज्जनांत, आपोआपच स्थापित झालं. कालिदासाचा काल निश्चयात्मक समजत नसल्या- मुळे त्याची आजपर्यंत बरीच ओढा- ताण चालली आहे. विद्वज्जन- समूहांत देखील तत्संबंधीं भतभेद आहे. कोणी ह्मणतात त्याचा काल.