पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ भारतीय साम्राज्य. [भाग ग्रीक वाचकच होय. ग्रीक लोकांचा हिंदुस्थानांत प्रवेश शिकंदर बादशहाच्या कारकीर्दीत झाला; आणि त्या राजपुत्रानें या भरतखंडावर स्वारी इ. स. पूर्वी ३२७साव्या वर्षी केली. तेव्हां अर्थातच प्रोफेसर मजकूर यांच्या समजुतीप्रमाणे पाणिनीचा काल सहरहू साला- नंतरचा असावा. आतां ही गोष्ट केवळ निराधार असूनही सदरहू प्रोफेसर ती अगदीच सिद्धवत्शी मानतात. परंतु, वास्तविक पाहतां तसा यत्किंचितही प्रकार नसून, शोधकबुद्धीने विचार केला असतां असे दिसून येतें कीं, 'यवन' शब्द केवळ ग्रीकवाचक नसून तो भारतीयां शिवाय इतर लोकांचा संज्ञक होय. व त्या कामी, प्रोफेसर लासेन् आणि प्रोफेसर मुलेर यांचें देखील तसेंच मत आहे. अस्तु. आतां पाणिनीच्या अष्टाध्यायीरूपी सुंदर, पाणिनीच्या अष्टाध्या-विचित्र, आणि भव्य मंदिराविषयों, योविषय इतर राष्ट्राचे पृथ्विीवरील इतर राष्ट्रांचा काय अभिप्राय. अभिप्राय आहे त्याबद्दल थोडेंसें दिग्- “Yavana is not the exclusive name of the Grecks or Ionians. Professor Lassen has proved that it had a much wider meaning, and that it was even used of Semitic Nations." (Maxmuller's Anc. Sans. Lit. P. 501). According to Goldstucker, Yavanáni alluded to by Panini was the Persian cunciform alphabet, (Goldstucker's Panini P. 17.)