पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] व्याकरणशास्त्र. २०९ दर्शन करून, पुढील विषया कडे वळू. हा विषय किती महत्वाचा आहे हे त्याच्या स्वरूपावरूनच कळण्या सारखे आहे. कारण, संपूर्ण माहितीनें परिप्लुत असा व्याकरणावरील ग्रंथ पाणिनीच्या अष्टाध्यायीशिवाय, अखिल जगत्तलावर कोठेंही नाहीं. शब्दव्युत्पत्तीच्या संबं धानें साद्यन्त विवेचन तर ह्यांत अप्रतीम रीतीनें केलेले दिसतें. धातुव्यवच्छेद फारच मार्मीकपणानें केल्याचे आढ- छून येते. लघुविवेचन पद्धतीविषयीं तर त्या ऋषिवर्याचा हातखंडा. आणि भाषामूलतत्वाची विवेचनपद्धति, व तत्सं- बंधी अथपासून इतिपर्यंत विस्तीर्ण ऊहापोह, यांत त्याची बरोबरी आजपर्यंत कोणी देखील केली नसल्यामुळे, हें अनुपम लावण्यरत्न, आपल्या अद्वितीय तेजानें विद्वज्जन- समूहास व पंडितवृन्दांस आल्हाद देऊन, तें पुराण व अक्षय्य प्रभेनें मंडित होत्सातें, जसेच्या तसेंच निरंतर चमकत राहिलेले आहे. प्रसिद्ध इतिहासकार एलफिन्स्टन हे तत्संबंधानें असें लिहितात की:- - “The language ( Sankrit ) so highly com- mended seems always to have received the attention it deserved. Panini, the earliest extant writer on its grammar, is so ancient as to be mixed up with the fabulous ages. His works and those of his suc- cessors have established a system of grammar