पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] व्याकरणशास्त्र. २०७ भाष्य नामक एक विस्तीर्ण ग्रंथ तयार केला. त्यानंतर हरदत्त, चंद्र, भीमसेन, वगैरे लहान मोठे वैयाकरणी झाले. परंतु ह्या सर्वांत अत्युत्तम टीकाकार ह्मणून, फार नांवाजलेले आणि विशेष प्रसिद्धीस आलेले असे भट्टोजी- दीक्षित होत. यांचें राहणे श्रीक्षेत्र काशी येथें असून, त्यांच्या वंशजांस त्या क्षेत्री अग्रपूजेचा मान अजूनपर्यंत देखील चालत आहे. हे भट्टोजीदीक्षित अगदी अर्वाचीन असून, त्यांजला होऊन गेल्याला सुमारे दोन अडी- चशे वर्षे झाली असावीत. त्यांनीं पाणिनीच्या सर्व प्रसिद्ध अष्टाध्या- यीवर कौमुदी या नांवाची सर्वमान्य वृत्ति केलेली आहे. ती इतकी अलीकडील असतांही, सायणाच्या वेद भाष्याप्रमाणे तिचें महात्म्य व पंडितमान्यता लागलींच स्थापित होऊन, काशिकादि वृत्तीपेक्षां देखील तिचें आजमित्तीस मोठें प्रामाण्य मानले जातें. भट्टोज दिक्षितकृत्त कौमुदी. आतां पाणिनीच्या कालाविषयों प्रोफेसर वेबरने जी उत्प्रेक्षा घेतली आहे त्याबद्दल थोडा पाणिनीच्या काला संबंध उद्भवलेल्या विचार करूं. त्याचे ह्मणणे असे की, पाणिनीनें आल्या शंकेचें निवारण. अष्टाध्या- यीच्या सूत्रांत 'यवनानी' शब्दाच्या घटनेविषयीं नियम सांगितला असून, त्याच्या मर्ते 'यवन' शब्द केवळ