पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचें मूलनिवासस्थान. 6 मेघ गर्जित' अथवा 'मेघदेवता ' असाच आहे. ह्या पर्जन्य शब्दाचें स्थित्यंतर, स्थलांतर व अपभ्रंशानें झालेलें रूपांतर, हीं मनांत आणिली ह्मणजे असे भासमान होतें कीं, जो वृष्टिवाचक शब्द सात आठ हजार वर्षांपूर्वी आमच्या आर्यांनी भरतखंडांत सिंधुद तीरावर मेघप्रसादार्थ वापरला, तोच शब्द कांहीं अपभ्रंशानें, तद्धेतुपूरणार्थच, युरोपांतील कांहीं राष्ट्रांत गेल्या सत- राव्या शतकांतही प्रचारांत होता; व ही गोष्ट प्रथम दर्शनीं जरी महत्वाची वाटत नाहीं तरी, त्याबद्दल सूक्ष्म विचार केला ह्मणजे गेलेला पुराणकाल हल्ली अर्वाचीन काळी देखील प्रत्यक्ष दृष्टीगोचर झाला असें खचित भासतें; तत्कालीन प्राचीन शब्द अर्वाचीन शब्दाप्रमाणेच अजूनही प्रचारांत आहेत असें अनुमान होतें; आणि ते शब्द आर्यकुलोत्पन्न शाखांतच वापरते असल्यामुळे, ते प्रसिद्ध पुराण लोक पूर्व निवासस्थानांतच जणूकाय पुनश्च अवतरले, असे वाटतें. शिव, मातृ, भ्राव, स्वसृ ( सौदर्या, ) दुहिट, वगैरे अनेक संस्कृत शब्द इतर भाषांत कांहीं रूपांतरानें पुष्कळ आढळतात. त्याविषयी आणखी येथें जास्त विस्तारानें लिहिण्याची अवश्यकता नाहीं. हिंदु आर्य लोक. हिंदुस्थनांत जे आर्य लोक अनादिकालापासून राहत असत, त्यांचेच आम्ही ब्राह्मण, व क्षत्रिय, आणि