पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ भारतीय साम्राज्य. [ भाग अवध्या ३९८३ सूत्रांत केलें; व तेही लाघवचमत्कृतीनें विभूषित करून, ज्यानें भारतीयांची जगद्वंद्य भाषा शब्दरूपजलाने अगदी शुद्ध केली; व ज्यानें अज्ञानजन्य मतिभ्रमाचें सर्वथैव निरसन केलें; त्या पाणिनीनें केवळ आपल्या बुद्ध्यैश्वर्याच्या योगानें अखिल जगास सकौतुका- श्चर्य तोंडांत बोटे घालावयास लाविलें, याबद्दल जेवढे वर्णन करावे तेवढे थोडेंच. पाणिनीचाकाल. पाणिनीचा काल इ. स. पूर्वी ७०० वर्षे असून, त्याच्या अगोदर बरोच वर्षे प्रसिद्ध वैयाकर- णी शाकटायन यानें शब्दानुशासन ह्मणून एक ग्रंथ केला होता. त्याजवरच यक्षवर्मा नामक जैनानें चिंतामणिवृत्ति या नांवाची टीका केलेली आहे. पाणिनीनंतर महत्वाचे वैयाकरणी म्हटले म्हणजे कात्यायन व पतंजलि हे होत. ह्यांपैकी पहिल्याने अष्टाध्यायीस पारीशष्टादाखल अ- नेक वार्तिकें रचिलीं असून, दुस- ज्यानें हीं वार्तिकें आणि अष्टाध्या यीची सूत्रे, यांची चांगली व नीट व्यवस्था लावून महा- अष्टाध्यायीचे भा ध्यकार. १. “Pànini, therefore, must have flourished in the beginning of the seventh century before the Christian-era, if not earlier still." (Early History of the Dekkan) By Dr. Bhandarkar. P. 8. -