पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] व्याकरणशास्त्र. २०६ बुद्धिमत्तेची जेवढी म्हणून तारीफ करावी तेवढी थोडीच. सर्व भाषांचा मूळ पाया व्याकरणच असल्यामुळे, त्यांतील एकंदर शब्दांचे शास्त्रीय विवेचन, त्यांची मूलोत्पत्ति, तत्- संबंधी संक्षिप्त विवरण, त्यांचें यथोचित नियमन, आणि भाषेचें यथार्थ संगोपन, इत्यादि सर्व गुणांनी अलंकृत व परिपूर्ण असा ग्रंथ किती महत्वाचा व अवश्य आहे, हे प्रस्तुतच्या विद्याविलासविभूषित अशा एकोणीसाव्या शतकांत तरी, जास्त विस्ताराने सांगण्याची कांहीं अवश्यकता आहे, असे वाटत नाहीं. हा अमूल्य ग्रंथ म्हटला म्हणजे अष्टाध्यायी होय. ह्यांत संस्कृत भाषेची अत्यावश्य सेवा आमच्या जगद्विख्यात पाणि- तत्कृत अष्टाध्यायी नीनें फारच आश्चर्यकारक रीतीनें व अतीव मार्मिकपणानें केली आहे. आणि म्हणूनच त्या पुराग व सर्वमान्य ऋषीविषयीं, खाली लिहिल्याप्रमाणे यथार्थ वर्णन आहे. येनधौतागिरःपुंसां विमलैः शब्दवारिभिः । तमश्राज्ञानजंमित्रं तस्मपाणिनयेनमः जी संस्कृत भाषा प्रगल्भ, विस्तीर्ण, आणि परिपक्च; जिच्यांतील शब्दसंग्रह अपार; व ज्यांतील रूपांची साधनिकाही अति- विचित्र; अशा भाषेचें नियमन ज्यानें तिचें खरें महत्व व उपयुक्तता. १८