पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ भारतीय साम्राज्य. [ भाग हिंदूंपासून अनेक विषयांचें ज्ञान संपादन करून घेतले असून, त्यांत अध्यात्म विद्येविषयीं तर त्यांनी आपली अत्युत्कट लालसा प्रदर्शित केली असल्याचें दिसतें. कारण, ते लोक आमच्या हिंदूंच्या अध्यात्मज्ञानाविषयीं फारच गौरवानें वर्णन करितात. आणि ह्यासंबंधाने ते आमचे पूर्ण ऋणी आहेत, असे त्यांच्याच लेखीवरून निर्विवाद सिद्ध होतें. डाक्तर लारिन्सर प्रभृतींचें आणखी असेही ह्मणणें आहे कीं, भक्ति व श्रद्धा हीं भक्ति व श्रद्धेचें दोन्हीं, मूर्तिपूजकांत गीतेशिवाय पौराणत्व. अन्यत्र कोठेंही ग्रंथांतरी आढळत नसून, ती स्त्रिस्ती धर्मीतूनच गीताकारानें उचलून घेतलीं आहेत. ह्या त्यांच्या ह्मणण्यास देखील बिलकुल आधार नाहीं, व त्यांच्या इतर प्रमेयांप्रमाणें हें ह्मणणें देखील प्रमाण- ५ १ “ They ( the Greeks ) had, however, a great impression of their (Brahmin's) wisdom." (Elphinstone's History of India.) २ "And Onesicritus, whose conversations with them (Hindus ) on philosophy have been already mentioned, expressly says that they inquired whether the Greeks ever held similar discourses, and makes it manifest that they were entirely uninformed regarding the sciences and opinions of his countrymen" ( the Greeks. ) ( Elphistone's India P. P, 471 / 472 )