पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] महाभारत. १८३ श्वेतबंधु डाक्तर स्ट्रॉस्स असे लिहि- तात कीं, 'नव्या कराराचे चवथें पुस्तक पारदेशिक भूमीतच उदयास आले असून, येशूचें ज्या मूळ मंडळीत बसणें उठणें असे, त्या मंडळीला श्रुतही नव्हते अशा ज्ञानतत्वांचे संस्कार व प्रावल्य, त्यांत दिसून येतें. डीन मिल्मन्चाही' असाच अभिप्राय आहे. ते म्हणतात की, 'भरतखंडांत ज्या मतांचा प्रभव झाला त्या मतांचेंच विशेष प्राबल्य पाश्चि- मात्य देशांत अनेक शतकें होऊन, त्यांचाच संस्कार ख्रिस्ती धर्मावर मुख्यत्वेंकरून झाला. ' आणि हे ह्मण- र्णेही अगदीं सयुक्तिक दिसते. कारण, ग्रीस देशांतील पिथागोरस हा हिंदुस्थानांत आला असून, त्यानें ब्राम्हणांपासूनच तत्वविद्याशास्त्र व कांहीं दर्शनें समजावून घेतली होती. तसेंच, ज्या वेळीं शिकंदराची स्वारी ह्या देशावर आली होती, त्या वेळी देखील ग्रीक लोकांनी , त्या दुराग्रहाचें खंडन. १ The fourth Gospel, he says, “ bears every indication of having arisen upon a foreign soil ; and under the influence of a philosophy of the time unknown to the original circle in which Jesus lived." २ Dean Milman has said, that “ it is by no means improbable that tenets which had their origin in India have for many centuries predominated in, or materially affected, the christianity of the whole Western World.,