पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ भारतीय साम्राज्य [ भाग शाबासरे गडी ! ! धन्य तुमची !! घटित गोष्टीवरून किंवा वस्तुस्थितीअन्वयें, अमुक एक गोष्ट सिद्ध आहे, असें शोधक व निःपक्षपाती इतिहासज्ञ प्रतिपादन करितात. परंतु आमच्या ह्या राजश्रीचें सगळेच उलट. हे गृहस्थ इच्छित गोष्ट आपल्या मनाप्रपाणें स्थापित करण्यासाठी, घटित गोष्टींत किंवा वस्तुस्थितीत देखील फेरबदल करूं पाहतात. आहेकनी कांहीं कांहीं पाचा- त्यांची विलक्षण कोटी ? ? त्यांचा दुराग्रह. गीतेंत वायवलांतील नीतितत्वांचें अवलंबन केले आहे, इतकें शाबीद करण्यासाठी सदरहू गृहस्थांनी जणूकाय विडाच उच लल्यासारिखें दिसतें. आपले मत हवत्या प्रकारें, अथवा . कोणत्याही सूक्त असूक्त रीतीनें सिद्ध करण्याची डाक्तर लारिन्सर यांची “अपूर्व” शैली पाहून, एका फ्रेंच तत्व- वेत्त्याची आठवण येते. तो असें ह्मणतो की, 'घटित गोष्टी अथवा एकंदर वस्तुस्थिति जर माझ्या इच्छेनुरूप जुळत्या येणार नाहीत, तर त्या गोष्टींतच मी जरूर तो फेरफार करीन. ' असो. एकंदरीत विद्वान मंडळी खरी ! ! ! बरें, ह्यांचेच १ The French philosopher says : –“ If the facts do not suit my theory, so much the worse for the facts. "