पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४व[ ] महाभारत. १८१ इ. स. नंतर जो नवी करार आका- शांतल्या वौपानें प्रकट केला, त्यांतील धर्माची अथवा नीतीचीं तवें गीतेंत कोठून येणार ? अर्थातच नाहीं. आणि जर ही गोष्ट अशा प्रकारें इतकी दर्शनीच उघड आहे तर, ती उलट सुलट बनावट करून, जगापुढे कांहीं तरी भलतेच मांडण्यांत काय हेतु असावा, याविषयीं मनांत साहजीकच विकल्प उत्पन्न होतो. परंतु, ह्या कोडाचा उलगडा डाक्तर लारिन्सर यांणी आपण होऊनच कृपा करून केला आहे, त्याबद्दल आपण त्यांचे फार आभारी असलें पाहिजे. ते असें ह्मणतात की, 'येन केन प्रकारेण भगवद्गीतेला अर्वाचीनत्व आणून, नव्या करारांतील मतांचेंच तिच्यांत प्रतिबिंब उठलें आहे, इतकेंच सिद्ध करून दाखविण्याचा आमचा हेतु आहे. ' बाहवा !! पाश्चात्यांच्या आ क्षेपांचें बालिशव. १New Testament. २ येशूख्रिस्तानें. ३ Dr. Lorinser says, " our aim here then must be to establish that the Bhagwadgita may be attributed to a period in which it is not impossible that its Composer may have been acquainted. .with different books of the New Testament. " ( Bhagwat Gita. By K. T. Talang. ) १६