पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

POONA ORT CLASS... NO १०वा] आर्याचें मूलनिवासस्थान. कांहींनी इंग्लंडांत जाऊन कथिलाची शोधनक्रिया चालविली. कांही घराणीं खोरासान, रूसदेश व काळा- समुद्र वलांडून थ्रेस देशापर्यंत गेली. आणि कांहीं आर्मिनिया देशांतून निघून कॉकेसस पर्वतावरून जर्मनीत उतरली. हा सर्व शोध भाषाव्युत्पत्तिसाधनांनीं लागला असल्यामुळे विद्वज्जनांची अशी खात्री होत चालली आहे कीं, पूर्वी केव्हां तरी एकदां हिंदु, पारसीक, ग्रीक, रोमन, जर्मन व इंग्रज ह्या लोकांचे पूर्वज ( तुराणी आणि शमी या दोन्हीं कुटुंबांपासून निराळे असे ) एकाच ठिकाणी राहत होते. तथापि, भरतखंडांतूनच ह्या शाखा अशा प्रकारें चोहोंकडे पसरण्यास बिलकुल प्रत्यवाय दिसत नाहीं. ७ आदिभाषा संस्कृत. असो. आतां, ह्या विस्तीर्ण आर्यकुटुंबाचे मूळचे वसति- स्थान एकच असल्यामुळे त्यांची व्यवहार भाषाही एकच होती असे दिसतें. आणि ही गोष्ट आर्य विस्तृत अनेक शाखांत जे मूळ- शब्द किंवा त्यांचे अपभ्रंश दृष्टीस पडतात, त्यावरून सिद्ध होतें. संस्कृत भाषेतील अनेक शब्द, अपभ्रंश होऊन रूपां- तर झालेल्या भिन्न भिन्न अवस्थेत, निरनिराळ्या राष्ट्रांत, आज मित्तीसही आढळतात; आणि त्यावरून पुराण संस्कृत हीच आदिभाषा असावी असे निश्चयात्मक ठरते. संस्कृतांतील मूळ शब्द 'अग्नि' याचें ल्याटीन भाषेत