पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [भाग पठार हेंच प्रदेश होय. पारसीकांच्या मध्य आशियांतील ठेवण्यासारखें प्रथमचें ठिकाण झटलें म्हणजे मध्यआशियांतील उच्च वन्दिदाद नामक धर्म पहिल्या अध्याया- वरून असे समजते कीं, सिहून ( सिरडेरिआ ) व जिहून ( अमुडे- रिआ, अथवा ऑक्षस् ) ह्या नद्यांच्या उगमानजीकच्या प्रदेशांत आर्य लोकांची वस्ती होती. आतां, ह्या दोन्ही नया पूर्व तुर्कस्थानांतील डोंगरांत उगम पावून वायव्य- गामी होऊन अर्लच्या समुद्रास मिळतात, ही गोष्ट लक्षांत ठेविली ह्मणजे आर्यलोकांचें मूलनिवासस्थान कोणतें असावें, याविषयीं सहज कल्पना करता येईल. या ठिकाणापासून पुढें कालगत्या स्थलांतर होऊन, हे आर्य- लोक सरकत सरकत पूर्व दिशेकडे जात जात, कांहीं हिंदुस्थानांत उतरले, व कांहींनीं पश्चिम मार्ग आक्रमून यूरोपखडांत ठिकठिकाणीं वस्ती केली. पश्चिमेकडे जात असतां कांही आर्यांनी इराणचें राज्य स्थापिलें, कांहींनी सुप्रसिद्ध अर्से आथेन्स नामक शहर वसविलें, व कांहीं नीं रोम शहरांत साम्राज्य केलें. याच आर्यकुटुंबांतील एक शाखा स्पेन देशांत गेली असून, त्यांनी तेथें खाणी खणून रौप्यशोधन आर्याचें मूलनिवास- पुस्तकाच्या असल्याविषयी स्थान कांहींचे मत. आर्याचा सर्वत्र वि स्तार. क्रिया चालविली असल्याचें इतिहासप्रसिद्ध आहे. .