पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] महाभारत. . १७५ धर्म व आमचा शास्त्रकलाप, या सर्वात कांहींना कांहीं तरी निष्कारण व्यंग दाखविण्याचा सदरहू पाश्चिमा- • त्यांचा क्षुद्र प्रयत्न उघड दिसून येतो. आतां, हे त्यांचे प्रतिपादन, किंवा सदरहू प्रकारचें मतप्रकाशन, योग्य व आधार- सहीत असतें; अथवा त्याबद्दल सकारण असे बलवत्तर प्रमाण ते दाखविते; तर त्या कामी आमचें कांहींच ह्मणणे नव्हतें. परंतु तसा यत्किंचितही प्रकार नसून, वरील सर्व मतें केवळ निराधारच आहेत, असे नानाशास्त्रविशारदांनीं ठरविलें आहे. सदरहू मतांचें य- थार्थ खंडन. १ महाभारत काव्य फार प्राचीन असल्याविययों डाकूतर रामकृष्ण गोपाल भांडारकर यांनी कर्नल एलीसच्या लेखाचें अत्युत्तम खंडन केले आहे. २ रामा- यण हें महाकाव्य त्याहीपेक्षां पुराणतर असून, हामर काव्यांतील यत्किंचितही अनुकरण त्यांत नाहीं, अशा- विषय फार मार्मीक व खरपूस टीका प्रोफेसर वेबरच्या लेखा- वर, नामदार काशीनाथ त्रिंत्रक तेलंग यांनी केली आहे. “ Consideration of the date of the Mahabha- rata " in connection with the correspondence from Col. Ellis. By R. G. Bhandarkar M. A. (R. A. S. Journal Vol. X. P. P. 81/92.) “ Was Ràmáyan copied from Homer " (By the Hon. Mr. K. T. Telang. ) २.