पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] महाभारत. सदरहू सूत्रांचा काल इ. स. पूर्वी १००० वर्षे होय. त्यावरून एकंदर अनुमान करितां असे दिसतें कीं, महा- भारत हें महाकाव्य रचल्याला सुमारे तीन ३००० हजार वर्षे झाली असावीत. आणि हें, लोकांची तद्विषयक पूज्य बुद्धि, अनुपम प्रेम, व त्यांच्या हृदयांत बिंबलेली दृढतर श्रद्धा, इत्यादि प्रमाणांवरून संभवनीयही वाटतें. १ याप्रमाणे महाभारत काव्याचा इतका पुराणकाल असून, तें इ.स. १५२१ साला- नंतर झालें असावें, अशाविषयीं महाभारत. कर्नल एलिसे यांचे म्हणणे आहे. रामायण. २ तसेच रामायण महाकाव्य हे त्यापेक्षां देखील फार जुनाट असून, ते इ. स. च्या प्रारंभी किंवा त्या सुमारास झाले असावें असें प्रोफेसर वेवरे यांचे प्रतिपादन आहे. वेद. ३ व ह्या दोहोंपेक्षांही ॠग्वेद हे अति पुराण, आणि विशेषतः अखिल जगाचे आदिलेख असून ते व हिंदूंचा इतर १. What can India teach us ? By Pro. Max- Muller. (P. 207.) २. Journal of the Bombay Branch of the Royal Asiatic Society. No. XXVIII. Vol. X. 1871-72. P. P. 81-82. ३. Indian Antiquary.