पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ भारतीय साम्राज्य. [ भाग ३७३० वर्षे असल्याचें, त्या शिलार्पित लेखावरून कळतें. त्यावरून शक कालाच्या सहाव्या शतकाच्या आरंभी, महाभारत युद्धाला ४२३६ वर्षे, किंवा स्थूलमानानें ४००० चार हजारांवर वर्षे होऊन गेली होती, असे अनु- मान होतें. सदरहु युद्धानंतर कांहीं कालाने महाभारत ग्रंथ तयार झाला असावा. आतां, ज्या अर्थी रामायणांत महाभारतांतील कथा- नकांचा यत्किंचितही उल्लेख नाहीं, त्या अर्थी तें युद्ध होण्यापूर्वीच, ह्मणजे आज मित्तीस सुमारें पांच ५००० हजार वर्षीवर किंवा इ. स. पूर्वी ४००० वर्षीवर, महा- काव्य रामायण रचले असावें, असे वाटतें. मागें सांगितल्याप्रमाणे आश्वलायन गृह्यसूत्रांत महा- भारताचा उल्लेख असून, शिवाय ऐतरेय ब्राह्मणांत देखील त्यां- तील कांहीं कथाभागांच्या मुख्य पात्रांचा निर्देश केल्याचे दिसतें. आतां, तिन्ही वेदांच्या ब्राह्मणांचा काल श्रौत व गृह्यसूत्रांच्या पूर्वीचा असून, ऐतरेय ब्राह्मण, व सूत्रांचा काल. १. “ It thus appears that in the latter part of the sixth century the war which forms the theme of the Maha Bharata was considered to have taken place about four thousand years before.” (Journal B. B. R. A. S. Antiquity of Máhà Bhàrata)