पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] महाभारत. १७१ वाटेंतील झार्डे तोडून मार्ग साफ करणारे, तंबु वगैरे शिव- णारे, शिबिरादि निर्माण करणारे, निर्जल देशांत पाणी काढणारे, विहिरी खणणारे, पाण्याचे बंब तयार करणारे, बांबू काम करणारे, चर्मकाम करणारे, सुतार, लोहार, कासार, तांबट, आणि नानाविध पाक निष्पत्ति व रस तयार कर णारे, इत्यादि अखिल जनसमूह त्याच्याबरोबर होता. यावरून तत्कालीन लोकस्थितीचें व समाजरचनेचें उत्तम दिग्दर्शन होतें. महाभारत. 166K महाभारताचा काल. रामायणानंतर दुसरें प्रसिद्ध महाकाव्य ह्मटलें ह्मणजे महाभारत होय. कौरव आणि पांडव यांजमध्यें राज्यविभागाकरितां अतिप्रचंड यादवी माजून जें तुमल युद्ध झाले; त्याचेंच यथार्थ वर्णन महाभारत काव्यांत अप्रतीम आणि चमत्कारिक काव्यरचनेनें अलंकृत केलेलें दृष्टीस पडतें. हें भारतयुद्ध कधीं झालें अशाविषयीं एक कालसूचक शिलालेख धारवाड आणि मैसूर परगण्यांत इवल्ली येथील देवालयांत सांपडला आहे. सद रहु पाषण लेखाचा काल शके ५०६, ह्मणजे इ. स. ९८४ असून, भारतयुद्धाचा काल तत्कालीन शकाअन्वयें