पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] रामायण. १६९ ह्या महाकाव्यांत आढळतें. एकंदर राज्य, व त्यांत सामील केलेले अन्य प्रांत, आणि काबीज झालेले मुलूख, याचेंही योग्य संरक्षण होण्यासाठी चांगला बंदोबस्त, व उत्तम फौज ठेविली असल्याचें दिसतें. आणि म्हणूनच काबीज केलेल्या प्रांतांत पूर्ण शांतता व सुरक्षितपणा होता, अर्से सहजींच अनुमान होतें. आपली प्रतिज्ञा खरी करण्यासाठी, रामाला वनांत पाठविणें ज्या वेळी प्राप्त झालें, त्या वेळी त्याला वनवा - साचें दुःख यत्किंचिदेखील होऊं नये म्हणून, त्याच्या- बरोबर भरपूर व सर्व प्रकारची सामग्री देण्याचें दशरथानें योजिलें. संरक्षणासाठी चतुरंगसेना, पोषणासाठी धान्य- कोश, दानधर्मादि व्यवहारासाठी भरपूर खजिना, भूषणा- साठी रत्नखचित अलंकार आणि ते पुरविणारे जवहिरे, गानवाद्यादिकांनी मनोरंजन होण्यासाठी वारांगना, कुस्त्या 9 २ [५] सुतरत्नसुसंपूर्णाचतुर्विधबळाचमूः । राघवस्यानुयात्रार्थक्षिप्रंप्रतिविधीयताम् धान्यकोशश्चयः कश्चिद्धनकोशश्चमामकः । 3 तौराममनुगच्छेतांवसंतनिर्जनंवने ॥ ७ ॥ रूपाजीवाश्चवादिन्योवणिजश्चमहाधनाः । ४ शोभयंतुकुमारस्यवाहिनीःमुप्रसारिताः ॥ ३ ॥ ॥ २ ॥ ( वा. रा. अयोध्याकांड २. सर्ग ३६. पोथी पृष्ट ६९।७०. ) १५