पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग विषय चांगलें अनुमान करतां येतें. आणि तत्कालीन निर्मळ आचार, सरळ विचार, व शुद्ध नीति, वगैरेसंबंधी उत्तम प्रकारचें दिग्दर्शन होतें. इतिहासदृष्टया रामायणाचें अवलोकन केल्यानें, तत्कालीन स्थिति वेदकालापेक्षां बरीच पुढे सरसावलेली होती, असे कळून येतें. तसेंच लोकांचे आचार व विचार, आणि समाजरचना, यांत देखील वेदकालतुलनेनें मह- दंतर दिसतें. नीतीचें शिक्षण अगदी उच्च प्रतीचें होतें अर्से भासते. शिल्पकलेचें पाऊल बरेंच पुढे पडलें असून, बहुतेक सर्व प्रकारचे धंदे भरभराटीत होते. कारण, नवा- हिरे, सोनार, सुतार, कासार, तांबट, लोहार, कोष्टी, विणकाम करणारे, हस्तिदंति काम करणारे, गायनाचीं वाद्ये करणारे, शस्त्रास्त्र बनविणारे, पुतळे घडविणारे, स्फ- टिकाचें काम करणारे, कांच करणारे, चितारी, गंधी, आचारी, इत्यादि नानाविध गुणीजनांचें प्रसंगानुसार वर्णन “ Milman and Schlegel vie with Wilson and Jones in their applause (of the Epics); and from one or other of those writers we learn the simplicity and originality of the composition; the sublimity, grace and pathos of particular passages: the natural dignity of the actors, the holy purity of the manners, and the inexhaustible fertility of imagination in the authors. " (Elphinstone's History of India P. 298/299)