पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] रामायण. मुळे, त्या प्रदेशाची माहिती देखील चांगलीच होती असें मटलें तरी चालेल. तसेंच, त्या वेळेस त्या भागाच्या लोक- स्थितीत देखील महदन्तर पडल्यासारखे दिसतें. आणि . त्यावरून ते आचारसंपन्न व विचारशील होते असेही वाटतें. ह्या गोष्टीवरून देखील महाभारतापेक्षां रामायण फारच जुनाट आहे अशी दृढतर रामायणाचा काल. कल्पना होण्यास चांगलें साधन मिळतें. आणि ज्यापेक्षां महाभारत युद्धालाच आज चार हजारांवर वर्षे होऊन गेली आहेत, त्यापेक्षां रामायण रचल्याला पांच हजारांहून जास्त वर्षे झाली असावीत हे उघड दिसतें. असो. आतां रामायणांतील भाषापद्धति, विचार सरणी, आणि पदलालित्य, यांविषयीं थोडें दिग्दर्शन करूं. यांतील भाषापद्धति सरळ असून सुबोध आहे. तरी प्रसंगानुसार ती उदात्त व ओजस्वी षापद्धति, व तत्का- देखील आहे, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. ह्या काव्यांतील विचारस- रामायणांतील भा लीन लोकनीति. रणी निर्मल आहे. तथापि, त्यांतील पदलालित्य मात्र म्हणण्यासारखें विशेष रमणीय नाहीं. ह्यांतील कल्पकत्व आणि अपूर्व रचनासामर्थ्य मनांत आणिलें ह्मणजे, त्या आदिकवीची कल्पनाशक्ति व विचारगौरव, नैसर्गिक प्रौढी व ओजस्विता, प्रसाद व वर्णनशैली, इत्यादि गुणां-