पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० वा] आर्याचे मूलनिवासस्थान. वरूनच विशेष बलवत्तर असे कांहींच प्रमाण दिसत नाहीं. याप्रमाणे सर्वांचेंच मूल जें आर्यकुटुंब व आर्य भाषा, यांची उत्पत्ति व विस्तार हीं, त्यांची जन्मभूमी जें भरतखंड यांतत्र होत गेलीं. तदनंतर या भरतभू- मीच्या वायव्य सरहद्दीच्या पलीकडे आर्यशाखेचा जो फैलाव झाला, त्याने आपली वाट पश्चिम दिशेकडे धरली असावी, हे केवळ संभवनीय दिसतें. आणि सादृश्य प्रमाणांवरून देखील सुधारणेचा फैलाव, आणि उन्नतीचा उदय, हीं पूर्व दिशेकडूनच पश्चिम दिशेकडे होत गेल्याचे सिद्धवत ठरतें ही आर्यशाखा पश्चिम दिशेनें आपल्या मार्गाचें आऋण करीत करीत, मध्य आशि यांतील उच्च पठारांतून इराण, ग्रीस, इताली, स्पेन, इंग्लंड, जर्मनी, रशिया, वगैरे देशांत उतरली. व त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती वसवून, राज्यही स्थापन केलीं; सबब त्याची सविस्तर हकीकत यापुढें दिली आहे. आर्य कुटुंबांतील शोखेचें पश्चिम दिशेकडे गमन. त्यांचा युरोपखंडां- त सर्वत्र विस्तार. आतां, कांहीं भाषातत्त्वज्ञांनीं मानवी जातीचीं मो- ठमोठीं तीन कुटुं कल्पिली आहेत. ती १ आर्य, २ तुराणी, आणि ३ शमी, अशीं होत. ह्यांच्या मतें या मानवी जातींच्या वस्तीचें लक्षांत