पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग प्रथमतः होमर आणि ईलियड या नामद्वयाच्या संबंधानें शोधाअन्ती दोन प्रश्न उत्पन्न होतात. पहिला हा कीं, होमर हा व्यक्तिविशेष होता की काय? आणि दुसरा असां कीं, तो होता अशी कल्पना केली तर, त्याच्या नांवावर विकत असलेली कार्ये ईलियड आणि ऑडिसी हीं समग्र त्यानेंच रचलीं किंवा नाहीत? पहिल्या प्रश्नाविषयीं तर विद्वानांत बराच मतभेद आहे, व त्यांपैकी, कांहींची अशी समज आहे कीं, होमर ह्या नांवाचा कवि म्हणून व्यक्तिविशेष मुळीच नव्हता. तर तन्नामाश्रित अशी अनेक ग्रंथकारांची काव्यें एकत्र होऊन त्या क्षुद्र कविसंघासच होमरे असे नांव पडलें. दुसऱ्या प्रश्नाविषयीं सर्व विद्वज्जनसमुहांचें बहुतकरून ऐक- मत्यच दिसतें. म्हणजे सदहू दोन्हीं काव्यें अनेक पठक, व भिन्न भिन्न आख्यायक, यांच्या परिश्रमाचे फल असून तीं नानाविधकवनग्रथित आहेत. फक्त त्यांतील मूलवि- षय, किंवा काव्यसंविधानक, हे मात्र अबाधित राखण्या- विषयों चांगली खबरदारी ठेविलेली आढळते. १ Vide the illiad edited by the Rev. W. Lucas collins, M. A; author of the " Ancient Classics for English Readers. (1888. P. P.1/2.) २ " Such explanation of the repetitions and incongruities which are to be found in the Illiad पुढे चालू.