पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] रामायण. दार व कितपत भरंवसेलायक होईल, याविषयीं योग्य विचार करण्याचे काम मी वाचकांवरच सोपतों. आतां, ह्या दोन्ही गोष्टींचें यथार्थ खंडन करून त्याबद्दल भवतिनभवति करणें, ह्मणजे प्रस्तुत ग्रंथाचा बिलकूल विषयच नव्हे. तथापि, सांप्रत काव्याच्या संबंधानें जी शंका उद्भवली आहे तिचें थोडक्यांत निरसन करून, पुढील विषयाकडे वळू. प्राच्य कवि वाल्मीकि हा पाश्चिमात्य कवि होमर होण्यापूर्वी, कित्येक शतकें अगोदर होमरकाव्य, आणि त्यांतील प्राच्य सांप्रदा- यांचे अनुकरण, व त्यांतील प्राच्य विषयक गंध. उदयास आला असून, रामायणां- तील कथानक पश्चिमेकडून पूर्वेकडे पर्यटन करीत आले, असा बिलकुल संभव देखील नाहीं. उलट, आमचें हें प्राच्य कथानकच भरतखंडांतून पश्चिम दिशेकडे गेलें असून, रामायणांतील संविधानकाचंच होमर कत्रीनें अनुकरण केले असावें, अशाविषयी चांगला आणि बल- वत्तर पुरावा दिवसानुदिवस मिळत चालला आहे. कारण, होमर हा पूर्वेकडील देशांत पर्यटन करीत होता, अशा- विषयीं मागील ग्रन्थान्तरी चांगले प्रमाण मिळतें. तसेंच, त्याच्या काव्यांत प्राच्य गंध आढळून येत असून, पूर्वेक- डील रीतिभातींचेंही अनुकरण त्यानें केले असल्याचे त्यांत स्पष्टपणे दिसतें.