पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ' ह्या व दुसऱ्या अनेक अन्तःप्रमाणांवरून व बाह्य पुराव्यावरून, रामायणाचें प्राचीनत्व अगदी निर्विवाद सिद्ध होत आहे. व तत्संबंधी उत्तम चर्चा आणि •साद्यन्त उहापोह नामदार काशिनाथ त्रिंबक तेलंग यांच्या अत्युपयुक्त लेखांत, फार मार्मिकपणानें व विशेष शोधकबुद्धीनें केला आहे. असें असून प्रोफेसर वेबर हे या महाकाव्याविषयीं असें लिहिताते कीं, तें ( १ ) इसकी त्यासंबंधी प्रोफेसर वेवरचें मत व त्याचें खं शकाच्या आरंभी किंवा त्या सुमारास डन. झाले असावें. आणि ( २ ) त्यांतील कथानक ग्रीक कवि जो होमर, याच्या ईलियड नामक काव्यांतून घेतलें असावें. सदरहू दोन्ही गोष्टी प्रोफेसर मजकूर केवळ गृहीतच घरीत असून, त्या योग्य रीतीनें स्थापित करण्यासाठी, किंवा त्यांच्या यथार्थ प्रतिपादनार्थ, बलवत्तर पुरावा अथवा प्रमाणभूत साधन ह्मणून, कांहींच पुढे आणीत नाहीत. तेव्हां अशा स्थितीत त्यांचें ह्मणणे किती वजन- १ "Was the Râmáyan Copied from Homer"? A reply to Professor Weber, by the Honorable K. T. Telang, in the paper read by him before the students Literary and Scientific Society, Bombay, on 2nd September 1872. २ Vide Indian Antiquary. P.P. 121. 252.