पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] रामायण. कविवर्य कालीदास हा आपल्या प्रसिद्ध काव्यांत * रामायण हे पहिले काव्य, आणि वाल्मीकि आदिकवि, असल्यावि- षयीं वर्णन करतो. आतां कालि- दासाचा काल* अजून निश्चयात्मक ठरला नाहीं. तथापि, तो इ. श. पूर्वी ५६ वर्षे, अथवा इ. सनाच्या चौथ्या, किंवा सहाव्या शतकांत उदयास आला असावा, अशी कल्पना आहे. हा कवि केवढा विद्वान्, किती शोधक, कसला मर्मज्ञ, आणि किती बहुश्रुत होता, हे विशेष रीतीनें सांगावयास पाहिजे असे नाहीं. ह्या कवीस महा- भारत काव्य देखील चांगल्या प्रकारें माहीत होतें. कारण, त्यांतील कथानकांच्या आधारेंच ह्यानें शाकुं- तल रचलें. तेव्हां असल्या व्युत्पन्न आणि विचक्षण कवीनें रामायणास आदिकाव्य, तसेंच वाल्मीकीस कवि- ज्येष्ठ, म्हणून जी पदवी दिली, ती केवळ निरर्थक किंवा निराधार दिली, असे मानण्यास यत्किंचित् देखील कारण नाहीं. कालिदास कवीची त्याविषयीं आदरोक्ति.

  • रघुवंश सर्ग १५. श्लोक ३३-४१.

Vide 1 History of Indian Literature. By Pro. Weber. 2 Was Rámàyan Copied from Homer ? By Justice Telang. 3 What can India teach us ? Max Muller. By Pro.