पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग दान मागितलें असतां त्यानें तें देण्याचें वर्जिल्यावरून, त्यांनी त्यास शाप दिला. तदनंतर राजाने त्यास संतुष्ट करून उशाप मागितला. तेव्हां ते ऋषी सुप्रसन्न होत्साते असे बोललें कीं, " रामायणाचें समग्र पारायण तूं एक दिवसांत श्रवण करशील तर, तुझ्या शापाची शान्ति होईल. " अशेषमेकेनैवान्हा श्रुत्वा रामायणं तव । शापस्य शान्तिर्भवती त्यूचिरेते प्रसादिताः ॥ * ह्या सर्व गोष्टींवरून, दामोदर राजा राज्य करीत असतां, ह्मणजे इसवी सनापूर्वी १७५ वर्षे, या महाका- व्याची मान्यता, त्याची सर्वत्र महत्वी, आणि त्याचें प्राचीनत्व, इत्यादिसंबंधानें लोकांची किती पूज्यबुद्धि होती, ह्याचें चांगले दिग्दर्शन होतें. अत्युग्र तप करून विश्वामित्र हा मागील त्रयीसह ऋषि झाला, म्हणून त्याची मोठी प्रशंसा रामायणांत केलेली आहे. त्याच गोष्टीचा उल्लेख पतंजलीच्या महाभाष्यांत केल्याचें आढळतें. त्यावरून पतंजलीच्या पूर्वी, म्हणजे इसवी शकापूर्वी १४३ वर्षे, या महाकाव्याची रचना झाल्याचें सिद्ध होतें.

  • राजतरंगिणी. कलकत्ता आवृत्ति १८३५ पान ६.

महाभाष्यांतील त्याचा उल्लेख.