पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग जसें कांहीं आजन्मतःच खिळल्यासारिखें झालें आहे. उत्तरेकडील अत्युच्च हिमालयापासून तो तहत दक्षिणे- कडील कन्याकुमारी नामक भूशिरापर्यंत, तसेच पश्चि- मेकडील सिंधू महानदीपासून तों थेट पूर्वेकडील विशाल अशा ब्रम्हपुत्रा नदीपर्यंत, रामाचा पराक्रम व एक • पत्नीव्रत, सीतेचें पातिव्रत्य व अनुपम लावण्य, लक्ष्म- णाची एक निष्ठा व बंधुप्रीति, आणि रावणाचें प्राबल्य व दुष्टबुद्धि, हीं आबालवृद्धांस माहीत आहेत. सदरी लिलिल्याप्रमाणे रामायणाचा उल्लेख महा- भारतांत असून, महाभारताचा नामनिर्देश आश्वलायन गुह्यसूत्रांत त्याचा काल निर्देश. पूर्वी १००० वर्षांच्या केल्याचें आढळतें. आतां ह्या सूत्रांचा काळ म्हटला म्हणजे इसवी शकापूर्वी प्रायशः एक हजार वर्षीवर होय. तेव्हां उघ डच, महाभारत हें काव्य, इ. श. पलीकडील कालांत रचलें गेलें, यांत तिलमात्र देखील शंका नाही. ह्या प्राचीन महा काव्यांत रामायणाचा उल्लेख आहे. आणि ज्या अर्थी अशा प्रकारचा उल्लेख आहे, त्याअर्थी रामायण हें काव्य लोकमान्य होऊन, त्याची सर्व प्रसिद्धि झाल्याला बरीच शतकें लोटल्यावर, त्यांतील कथाभाग प्रसंगानुसार महाभारतांत आला यांत बिलकुल शंका नाहीं. त्याचा महाभारतां- तील उल्लेख.