पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ माग आतां, याबरोबर दुसरीही एक कल्पना साहजीकच उत्पन्न होत असून, ती खरोखर विचार करण्यासारखीच आहे. अलीकडे तत्संबंधी दुसरें शा- स्त्रीय प्रमाण. शब्दव्युत्पत्ति शास्त्राच्या योगानें असे कळून येत आहे की, संस्कृत ही मूळ भाषा असून, त्यांतील शब्द, किंवा त्या शब्दांची मूलरूपें, अथवा त्यांचे अपभ्रंश, हीं इतर सर्व भाषांत दृग्गोचर होतात. त्यावरून अनेकभाषा- कोविद, आणि भाषातत्त्वज्ञ, यांनी असे एक तत्त्व शो- धून काढिले आहे की, ह्या सर्व भाषा बोलणारे भिन्न भिन्न राष्ट्रांतील लोक, हजारों वर्षीमार्गे, केव्हां तरी एकदां, मध्य आशियांतील उच्च पठारावर एकत्र राहिले असून, त्यांची सांज्ञिक, व परस्परांचे विचार प्रदर्शित करण्याची, एकच संस्कृत भाषा होती. परंतु कालगतीनें तेच लोक पुढें पृथक् पृथक् होऊन, निरनिराळ्या देशांत गेल्यामुळे, त्यांची भाषा साहजीकच भिन्न भिन्न झाली. तथापि, आर्य लोक आर्यावर्ताबाहेरून आले, असे मानण्यास येवढ्या- मागील पृष्टावरून पुढे चालू. out of India. Even mythology goes no further than the Himálaya chain in which is fixed the habitation of the gods.” ( Elphinstn's History of India. ) “ My lords, these Gentoo people are the original people of Hindustan." ( Burke Vol. VII P, 46 )