पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. १९४ भारतीय साम्राज्य. [ भाग स्कंदस्वामींनी वेदांवर एक संपूर्ण टीका केली अस- ल्याचँ दिसतें. यास्ककृत निरुक्तावर दुर्ग यानें टीका केली आहे, व तो इसवी सनाच्या तेराव्या शतकापूर्वी झाला असावा असे वाटतें. खरोखर पाहतां, ऋक्संहितेवर उत्तम अशी टीका झटली म्हणजे सायणाचार्याचीच होय. सायण आणि त्याचा भाऊ माधव यांनी वेदांच्या बहुतेक सर्व शाखांवर, व उपयुक्त विषयांवर टीका केल्या आहेत. हे बंधुद्वय बुक्क नामक राजाच्या पदरीं विजयानगर येथे मंत्री होते. ह्यांच्या हातांत सर्वच राज्यकारभार अस ल्यामुळे, त्यांनी आपल्या उच्च पदवीचा सुविनियोग करून वेदाभ्यासाला सर्व प्रकारें उत्तेजन देण्याचें मनांत आ णिलें. सायणाची ऋक्संहितेवरील टीका इसवी शका- च्या चौदाव्या शतकांत झाली असून ती फारच महत्वाची व अत्युपयुक्त आहे. ह्या टीकेपासून वेदाची फार प्राचीन भाषा, त्यांतील गुढश्लेष, आणि कठिण वाक्यार्थ, हीं समजण्यास फारच चांगले साधन झाले आहे. कांहीं यूरोपस्थ पण्डितब्रुव त्यांच्या नेहेमींच्या चालीप्रमाणें सायणाची अवहेलना करून त्यास मूर्ख व अप्रयोजक म्हणतात. परंतु " जानंतिते किमपि " हें भवभूतीचें वाक़्म मनांत आणून, त्या गौरकायांच्या ह्या वाक्पांडि- 66 सायणाचें भाष्य, व त्याचा काल.