पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेद व वेदागें. १५३ उल्लेख करणें राहिला आहे. सवय तो थोडक्यांत करून हे वेदकाण्ड पुरें करितों. वेदांवर टीकारूप असे प्रथमचे ग्रंथ म्हटले म्हणजे निघंदु आणि निरुक्त हे होत. ह्यांत वेदांतील कठिण शब्दांच्या अर्थाचें निरूपण केलें असून, ते वेदशब्दांचे कोशच म्हटले तरी चालेल. हे दोन्हीं ग्रंथ यास्क ऋषीनें केले आहेत. अत्रेयीकांडा- नुक्रमांत ह्याला पैंगी अशी संज्ञा असून, तो वैशंपाय- नाचा शिष्य व तित्तिरीचा गुरु असल्याविषयीं त्या ठिकाणी सांगितले आहे. यास्काचें नांव शतपथ ब्राम्ह णाच्या शेवटीं दृष्टीस पडतें, व पाणिनीनें देखील यास्क नांवाचा उल्लेख केल्याचे आढळतें. त्यावरून पाणिनीच्या अगोदर पुष्कळ वर्षे, म्हणजे इ. स. ७०० वर्षीच्याही बऱ्याच पली- कडील कालांत, वेदांतील कठिण शब्दांवर प्रथमची टीका किंवा कोश, यास्क ऋषींनीं केला, यांत संशय नाही. आतां निघंटु नामक कोशावर देवराजयज्वन् याची टीका असून, तो इसवी सनाच्या १५व्या किंवा १६व्या शतकांत 'झाला असावा. यानें आपल्या प्रस्ता- वनेंत निघंटूच्या इतिवृत्ताविषयीं बरैच विवेचन केलें आहे, त्यावरून यास्क ऋषी नंतर व ह्याच्या अगोदर त्यांचा काल. पूर्वी १३वा ] वेदांवरील मूळ टी. का ग्रंथ. इतर टीकाकार, व त्यांचा काल.