पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य [ भाग स्मृति श्रुति असे नामधेय पडलें. श्रुति- पासून स्मृति भिन्न आहे, व त्यांत धर्माधर्म विचार, आणि व्यवहार नीति, यांचे सविस्तर विवेचन आहे. ह्या विवेचन पद्धतीची उत्तम स्मृती राहावी या हेतूनें त्यांची चांगली सूत्रग्रंथि बांधली असून, त्या सूत्रसमूहास, आणि तत्संबंधी ग्रंथावलीस, स्मृति, असें म्हणतात. यांत कल्पसूत्रें, स्मार्तसूत्रे, श्रौतसूत्रे, व गृह्यसूत्रे, इत्यादिकांचा समावेश होत असून, त्या सर्वांवि- षयीं या मार्गे योग्य स्थळीं सविस्तर विवेचन केले आहे. आतां श्रुति कशास ह्मणावी, व स्मृति कशास ह्मणावी, या विषयींची व्याख्या मनुस्मृतींत थोडक्यांत दिली आहे. त्याची व्याख्या. १५२ श्रुतिस्तुं वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रंतुवै स्मृतिः । ते सर्वार्थेष्वमी मांस्ये ताभ्यां धर्मोहि निर्बभौ ॥ १०॥ ( मनुस्मृति, अध्याय दुसरा. ) ह्या व्याख्येवरून श्रुति म्हणजे वेद, आणि स्मृति झणजे मन्वादि ऋषींनी केलेलें धर्मशास्त्र होय. वेदांत संहिता, ब्राम्हण, अरण्यकें, सूत्रे, आणि उपनिषदें, यांचा समावेश होतो; व स्मृतींत श्रौतं आणि गृह्य सूर्ये, व धर्मशास्त्र, यांचा अंतर्भाव होतो. आतां वेदांच्या संबंधानें एक महत्वाच्या गोष्टीचा