पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदांगें. विवेचन आहे. याप्रमाणें सदरीं लिहिलेली आणि दुसरीं, अर्शी एकंदर, अथर्ववेदाची एकशें सत्तेचाळीस उपनि पर्दे असल्याचे कळते. सदरीं निर्दिष्ट केलेले वेद ईश्वरमणीत आहेत व ते ईश्वरप्रणीत वेद. परमेश्वराच्या श्वसनापासून निर्माण झाले, अर्से हिंदु लोक मानतात. ह्या वेद चतुष्टयांस समुदाय रूपाने श्रुति असे म्हणतात; व श्रुति, व श्रुति ह्या शब्दाचा अर्थ " जें ऐकिल तें " असा होतो. वेद शब्दाची व्युत्पत्ति विद् धातुपासून झाली असून त्याचा अर्थ ज्ञान" असा आहे. 66 यस्यनिश्वसितंवेदायोवेदेभ्योऽखिलंजगत् । निर्ममेतमहं वंदेविद्यातीर्थमहेश्वरम् ॥ 66 66 ह्या वाक्यावर आम्हां हिंदूंचा पूर्ण भरवसा आहे. ज्या भिन्न भिन्न ऋषींनीं वेद ऋचा रचल्या म्हणून आख्यायिका आहे, त्या ऋषीस " वेदस्रष्टारः " अशी संज्ञा नसून, त्यांस फक्त बद्रष्टारः ” असेंच नांव आहे. म्हणजे त्या ऋषींनीं वेद स्वतः केलेले किंवा रचलेले नसून, स्वयमेव निर्माण झालेल्या वेदांचा पाठ त्यांच्या कानांवरून गेल्यामुळे त्यांच्या श्रवणेंद्रियांस तो भासमान झाला; आणि ह्या कारणामुळेच वेदचतुष्टयांस