पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.१५० भारतीय साम्राज्य. [ भाग निर्वाण, व कैवल्य, यांविषयी सविस्तर हकीकत, आणि तीं प्राप्त होण्याची साधनें, यथावकाश सांगितलेली आहेत. आतां फक्त सांप्रदायिक उपनिषदांविषयींचा मात्र विचार करावयाचा राहिला आहे. ह्या उपनिषदांत आत्म्याच्या ठिकाणीं ब्रह्मा, विष्णु, महेश, यांची त्रिपुटी किंवा ते पृथक् पृथक् अथवा ऐक्यभावानें कल्पून, त्यांची भक्ती आणि आराधना करण्याविषयीं सांगितले आहे. नारायणोपनिषदांत विष्णूची पूजा सांगितली आहे. विष्णु हें नांव ऋग्वेदांत शतपथ ब्राम्हणांत नजरेस " ॐ नमो नाराणाय सांगितला आहे. महो "" पडतें. या उपनिषदांत ह्या महामंत्राचा उपयोग पनिषदांत नारायण हा विष्णूचा अवतार अस- ल्याचें कथन केलें असून, त्यापासूनच शूलपाणी (शिव) आणि ब्रह्मा हे झाले आहेत, असे वर्णन आहे. नृसिंहो- पनिषदांत नृसिंहाची उपासना, व मंत्रविधि, अशीं सांगितली आहेत. तैत्तिरीय आरण्यकांत नरसिंह है नांव प्रथमच दृष्टीस पडत असून त्याला वज्रनख व तीक्ष्णदंष्ट्र, अशीं विशेषणें लाविलेली आढळतात. राम- तापनीयोपनिषदांत रामपूजा सांगितलेली असून अथर्व शिरस् नामक उपनिषदांत गणपति, नारायण, रुद्र, सूर्य आणि देवी, यांच्या उपासनेचें पृथक् पृथक् सांप्रदायिक उपनि- षदें व अनेक धर्मपथ. .