पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदांगें. १४९ दुसरें गद्य आहे. गर्भोपनिषद् या नांवाचेंही एक उप- निषद आहे. त्यांत गर्भधारण, त्याचे घटकावयव, त्याचें गुरुत्व, आणि शारीररचना याविषयी विवेचन आहे. या शिवाय आप्तवज्रसूची व त्रिपुरी नामक गंद्यात्मक ग्रंथ शंकराने केलेले आहेत. ब्राम्हण, मोक्ष, जीव, परमेश्वर, आणि तत्वमसि, यांविषयींची व्याख्या व विवेचन आहे. ब्राह्मण शब्दाचें वर्णन करतांना, प्रथमदर्शनींच असें वेदांतपर पहिल्यांत त्यांत स्पष्ट सांगितलें आहे की, ब्रा- ह्मण ह्मणजे केवळ जातीनें, वर्णानें, अथवा पांडित्यानें होत नसून, जो खरोखर ब्रह्मविद् (ब्रह्म जाणीत ) असेल तोच ब्राह्मण समजावयाचा आहे. त्रिपुरींत आत्मा आणि जगत् यांचा सापेक्ष संबंध कशा प्रकारचा आहे हे सांगितले आहे. सर्वोपनिषत्सारोपनिषद्, आत्मनोपनिषद्, प्राणाग्नि- होत्रोपनिषद्, व आर्षिकोपनिषद् यांतही अध्यात्म विद्ये- चेंच विवेचन आहे. तारकोपनिषद्, जाबालोपनिषद्, साकल्योपनिषद्, कथाश्रुति, आरुणिकोपनिषद्, परम- हंसोपनिषद्, आश्रमोपनिषद्, वगैरे नानाविध उपनिषद् ग्रंथ असून त्यांत योग, मोक्ष, ईश्वर सायुज्य, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, आणि परित्राजिका यांचा आश्रमधर्म, ब्राह्मण शब्दाची व्युत्पत्ति.