पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग राळ्या ऋचा सामांत कशा रीतीनें ह्मणतां येतील यासं- बंधी विस्तार आहे. अथर्व वेदसंहितेचीं वीस कांर्डे, अंडतीस प्रपाठक, सातशें साठ सूक्ते, आणि सुमारें सहा हजार ऋचा आहेत. याजवर सायणाची टीका आहे, व याचे गोपथ- ब्राह्मण आहेत. त्यांचे अकरा प्रपा- ठक आहेत. पहिल्या पांच प्रपाठकांत उपनिषदें आणि कथानकें सांगितली असून, दुसऱ्या सहा प्रपाठकांत श्रौतकर्मविधी सांगितला आहे. याची कौशिक श्रौत सूत्रे आणि अथर्वण गृह्य सूत्रे आहेत. त्यांत भैषज्य, शापक्रिया, मंत्रक्रिया, वि- वाहविधि, पितृयज्ञ, व दुःशकुनप्रतिकार, इत्यादिकांचें वर्णन आहे..ह्या सूत्रांस कल्प म्हणून कांहीं भाग जोडलेले आहेत. त्यांस नक्षत्रकल्प, शांतिकल्प, वितानकल्प, संहिताकल्प, आणि अभिचारकल्प अशी संज्ञा आहे. विष्णुपुराणांत नक्षत्रकल्पाऐवजीं आंगिरसकल्पाचें क थन आहे. ह्या कल्पांत ज्योतिष- प्रकरण, इंद्रजाल, शकुन, व मंत्र, इत्यादिकांचें सविस्तर विवेचन आहे. मंदूकोपनिषद् आणि प्रश्नोपनिषद् अशीं अथर्ववेदाची मुख्य उपनिषदें आहेत. त्यापैकी पहिलें पद्य असून अथर्व वेदाची सं- हिता. त्याचे ब्राह्मण व सूत्रे. त्याची उपनिषदें, व त्यांतील विषय.