पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा ] आर्याचें मूलनिवासस्थान. कथानकें, ह्या सर्वोच्या अवलोकनावरून असें खचित अनु- मान होतें कीं, केवळ आमच्या भारतीयांचीच ऐतिहासिक स्थलविशेषें, या आर्यभूमीत आहेत अशी गोष्ट नसून, आमच्या अतिपूज्य देवादिकांची देखील निवासस्थानें, त्यांची विहारोद्यानें, आणि त्यांच्या संचारवीथिका, हीं यच्यावत् सर्व अत्युच्च, उदार, आणि श्रीमान् असा जो पूर्वपश्चिम समुद्रगामी हिमालय पर्वत, त्याच्या गगन- चुंबी शिखरांवर, व निम्न प्रांतभागी, आणि विशाल मेखला प्रदेशांवरच असल्याचें स्पष्टपणें दिसून येतें. हिंदुस्थान, व त्याच्या आसमंतांतील प्रदेश, यां- शिवाय दुसरेंच एखादें निवासस्थान आमच्या भारती- यांचें असल्याविषयीं, जर यत्किचित्ही उल्लेख आमच्या- अतिपुराण वेद ग्रंथांत, तसेच इतर सर्वमान्य प्राचीन पुराणांत, मिळत नाही, तर अनंत कालापासून भरतखं- डच आमची दयितआर्यभूमी असावी, व आम्ही परदेशांतून येऊन येथें नवीनच अधिनिवासस्थान केले नाहीं, असें ह्मणण्यास यत्किंचितही प्रत्यवाय दिसत नाही. १ “It is opposed to their foreign origin, that nei- ther in the code, nor, I believe, in the Vedas nor in any book that is certainly older than the code, is there any allusion to a prior residence or to a knowledge of more than the name of any country पुढे चालू.