पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग सामवेद संहिता. असून, त्या प्रत्येकाचे दहा दशत्, आणि त्या प्रत्येकांत दहा ऋचा आहेत. पहिल्या बारा दशतांत अग्नीची प्रार्थना आहे. त्या नंतरच्या छत्तीस दशतांत इंद्राची स्तुति आहे. व शेवटल्या अकरा दशतांत सोमाचे आवाहन आहे. दुसऱ्या भागाचे नऊच प्रपाठ आहेत, व त्यांत कमी जास्ती प्रमाणानें ऋचा आहेत. सामवेदांत ग्रामगेयगान, अरण्यगान, ऊहगान, आणि ऊह्यगान असे विभाग आहेत. या वेदांत एकंदर ऋचांची संख्या १८१० असून, पहिल्या भागांत ५८५, व दुसऱ्या भागांत १२२९, ऋचा आहेत. परंतु यांत ऋक्संहितेंतील बऱ्याच ऋचा आल्या आहेत. सामवेदावर सामवेदाचे ब्राह्मण. तांड्य, अद्भुत, छंदोग्य, प्रौढ, पंचविंश अथवा महाब्राह्मण, अशीं ब्राह्मणे आहेत. तांड्य ब्राह्म- णांत सोमयज्ञाच्या अनुष्ठानासंबंधी वर्णन आहे. यांत कौषीतकी ब्राह्मणांचा जरा निंदा केलेली असून, त्यांस, व्रात्य ( धर्मभ्रष्ट ), आणि यज्ञावकीर्ण (अनाधिकारी ) अशीं विशेषणें दिलेली आढळतात. अद्भुत ब्राह्मणांत अपशकुन व अरिष्ठ, यांचें विवेचन असून तन्निवारणार्थ प्रतिकारही सांगितलेले आहेत. पंचविंश ब्राह्मणांत प्रायश्चित्त व शापक्रिया यांचे वर्णन आहे. या