पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वंदांगें. १४५ त्यावरून त्यावेळच्या अस्वस्थतेच्या स्थितीचें दिग्दर्शन होर्ते. यांतच भिन्न भिन्न मिश्रजातींची हकीकत दिली आहे, त्यावरून सूक्ष्म विचार करतां हिंदूंचें जातिवैचित्र्य, त्यांची सामाजिक व्यवस्था, आणि दंडनीति, हीं अगदीं पूर्णतेस आल्याचे भासमान होतें. तिसाव्या अध्यायांत कोणत्या प्रकारचे व जातीचे पुरुष यज्ञाकरितां बळी द्याव- याचे, त्याविषयीं सांगितलें आहे. शुक्ल यजुर्वेदाचे शतप- त्याचे ब्राह्मण. थब्राह्मण असून, त्यांत १०४ अ- ध्याय, ४४६ ब्राह्मणें, व १८६६ कंडिका आहेत. ह्यांत होमविधि, अग्निरहस्य, प्रायश्चित्त, अश्वमेध, पुरुषमेध, आणि सर्वमेध, यांविषयीं विवेचन आहे. शेवटल्या सहा अध्यायांत उपनिषदादि भाग असून त्यांस वृहदारण्यकें ह्मणतात. वृहदारण्यकाचे तीन भाग आहेत. १ मधुकांड, २याज्ञवल्क्यकांड, आणि ३खिलकांड. श्रुक्ल यजुर्वेद ब्रा- ह्मणांत इतिहास कथानकें जागोजाग आढळतात. या वेदाची कात्यायनानें केलेलीं श्रौतसूत्रे असून त्यांचे सव्वीस अध्याय आहेत, व त्यांत यज्ञविधि, आणि प्रायश्चित्त संस्कार सांगितलेले आहेत. याची कातीय गृह्यसूत्रें पारस्क- रानें केलेली असून, याच ग्रंथकाराचें स्मृतिशास्त्रही आहे. सामवेदसंहितेच्या पहिल्या भागाचे सहा प्रपाठ त्यारण्य आणि. सूत्रें. १३