पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. १४३ सरंक्षण. गेली; त्यापासून त्यांच्या बुद्धीवर कोणता व्यापार घडला; प्रत्येक विषयासंबंधी त्यांची किती शोधकविचार शक्ती होती; त्यांच्या अश्रांत श्रमाचा एकंदर परिणाम आमच्या हिंदू समाजावर कसा घडून आला; त्यामुळे आज नऊ- दहा हजार वर्षीच्या उलथापालथीत आणि हिंदुधर्माचे आमचें हिंदुत्व कसें कायम राहिलें; आणि हा आमच्या धर्माचा इष्ट परिणाम आम्हांवर घडून आला नसता तर आमचें हिंदुत्व या मागें केव्हांच, कसें लयास गेलें असतें; याविषयीं तत्वदृष्ट्या विचार करण्याचें उत्तम साधन, व तत्संबंधी क्रमशः वृत्तांत, या वेदांत आढळतो. किंबहुना हा वेद- दुर्ग हिंदुधर्मसंगोपनार्थच रचला गेला, असे ह्मणण्यास काडीमात्रही शंका नाहीं. यजुर्वेदाचे दोन भाग आहेत. कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. यांची रचना कुरुपां- चाल क्षेत्रांत झाली असल्याचें तद- न्तर्गत प्रमाणांवरून दिसतें. कृष्ण- यजुर्वेदाचे दोन भाग, कृष्ण यजुर्वेद व शुक्ल यजुर्वेद. यजुर्वेदाला तैत्तिरीय अशीही संज्ञा आहे. याच्या संहि कृष्ण यजुर्वेदाची सं- तेच सात अष्टके आहेत. त्यांत च- व्वेचाळसि ४४ प्रश्न असून, सहाशे हिता. एकावन ६५१ अनुवाक व दोन हजार एकशे अठ्याण्णव २१९८ कुंडिका आहेत. यांत बहुतेक यज्ञविधी संबं-